हिंदू हितासाठी हिंदूंनी एकत्र यावे- लक्ष्मण जगताप Print

पिंपरी / प्रतिनिधी
हिंदू हित रक्षणासाठी हिंदूंनी संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे सांगत हिंदू धर्म व संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड येथे केले. रहाटणी येथील हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान आयोजित विजयादशमी उत्सवात वडगाव शेरी येथील वेदपाठी भागवत गुरुजी यांना प्रा. एकनाथ नाणेकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी पं. धर्मवीर आर्य, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, सविता खुळे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, कुमार जाधव, गजानन चिंचवडे, कीर्तनकार हांडे महाराज आदी उपस्थित होते. पं. आर्य म्हणाले, हिंदूंनी स्वधर्मरक्षणार्थ खरोखरीच शस्त्रपूजन करण्याची वेळ आली आहे. माता-भगिनींच्या रक्षणासाठी सदैव सिद्ध असले पाहिजे. प्रास्तविक उत्तम दंडिमे यांनी केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.