रास्त दरात लाडू-चिवडा उपक्रमाचे मंगळवारी उद्घाटन Print

पुणे/ प्रतिनिधी
दि पूना र्मचट्स चेंबरतर्फे रास्त दरात लाडू-चिवडा विक्री या उपक्रमाची मंगळवारपासून (६ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. या उपक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून दोन लाख पन्नास हजार किलो लाडू आणि चिवडय़ाच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  लाडू आणि चिवडय़ाचा भाव ८० रुपये प्रतिकिलो ठेवण्यात आला आहे.ओसवाल बंधू समाज कार्यालय येथे ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती दि पूना र्मचटस् चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया आणि या उपक्रमाचे प्रमुख राजेश शहा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये ‘लार्जेस्ट सवर्ि्हग ऑफ लड्डूज’ या विभागाखाली नोंद होण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सोमवारी (५ नोव्हेंबर) सकाळी साडेनऊ वाजता तीनशे किलो लाडू बनविण्यात येणार आहेत.