नामदेव शिंदे यांचे निधन Print

पिंपरी / प्रतिनिधी
कासारवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सुदर्शन मंडळांचे माजी अध्यक्ष नामदेव धर्माजी शिंदे (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुभाष शिंदे यांचे ते वडील होत.