कर्मयोगी कारखान्याचा उसाला २१०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर Print

प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या ऊस गाळप हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन २१०० रुपये पहिला हप्ता उचल जाहीर केला, कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानदेव बनकर यांनी ही माहिती दिली.
कारखान्यावर सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध उसाच्या संभाव्य गाळपाचा आढावा घेऊन जाहीर केले असल्याचे बनकर यांनी स्पष्ट केले.