लवासा, टाटा प्रकल्पाच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या ८१ आंदोलकांना अटक Print

प्रतिनिधी
लवासा, टाटा प्रकल्प व वांग मराठवाडी धरणग्रस्तांचे पुर्नवसन व प्रलंबित मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या ८१ आंदोलकांना सोमवारी दुपारी बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.  जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यां सुनिती सु. र. यांच्या नेत्वृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.