राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचाच पक्ष- बाबर Print

पिंपरी / प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असून, हा गुंडांचा पक्ष असल्याचे आपण पूर्वीपासूनच निदर्शनास आणून दिले होते, असे म्हटले आहे. थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
माणिकराव व अजितदादा यांच्यातील वाक्युद्धावर बाबर यांनी पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले. राष्ट्रवादीतील गुंडांची चौकशी करण्याची मागणी आपण सातत्याने करत आलो आहोत. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीच राष्ट्रवादीची पोलखोल करण्याचे धारिष्टय़ दाखवले आहे. आता मुख्यमंत्र्यांनीही धाडस दाखवावे आणि माणिकराव बोलले, त्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गुंडांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.