सुरक्षितता प्रबोधन : ‘महावितरण’ला पुरस्कार Print

प्रतिनिधी
विजेपासून होणारे अपघात टाळणे व सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कर्मचारी व नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीबाबत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने ‘महावितरण’ला नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक कर्नल राहुल गोवर्धन व मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) पी. यू. शिंदे यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे महासंचालक डॉ. भास्कर चॅटर्जी व टाटा इन्स्टिटय़ूटचे संचालक एस. परशुरामन यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.