विशेष कार्यक्रमातून उलगडणार भीमसेनजी आणि पंजाब यांचे नाते Print

प्रतिनिधी
ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि संगीत रसिकांची भूमी असलेल्या पंजाब यांचे अतूट नाते आहे. पंजाबमधील रसिकांकडून पंडितजींना मिळालेले प्रेम आणि दाद याविषयी माहिती देत हे अनोखे नाते उलगडणारा विशेष कार्यक्रम आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे रविवारी (११ नोव्हेंबर) सादर होणार आहे.
सवाई गंधर्व स्मारक येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध सरोदवादक पं. राजन कुलकर्णी यांच्याशी प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांच्या अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून ही मैफल उलगडणार आहे. भीमसेनजींच्या पंजाब दौऱ्यातील खास आठवणी आणि रंजक किस्से याद्वारे पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू जाणून घेण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. या वेळी पं. राजन कुलकर्णी यांचे सरोदवादन होणार असून त्यांना रामदास पळसुले तबल्याची साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था उपलब्ध असेल.