शैक्षणिक प्रयोगांबाबत परिषदेचे ७ ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजन Print

प्रतिनिधी
ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा सुवर्णमहोत्सव आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ७ ते ९ डिसेंबर या काळात निगडी येथे राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रयोगांबाबत माहिती व्हावी, हा हेतू परिषदेमागे आहे. देशभरातील अनेक शिक्षण क्षेत्रातील प्रयोग करणाऱ्या संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणप्रेमी परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.
ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे प्रा. विवेक पोंक्षे व मातृमंदिर संस्थेचे वामनराव अभ्यंकर यांनी ही माहिती दिली. या परिषदेमध्ये शैक्षणिक तत्त्वज्ञानावर चर्चा, समांतर सत्र, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, अध्यापक, पालक यांचे खुले अधिवेशन, शिक्षणतज्ज्ञांची व्याख्याने असे कार्यक्रम असतील. त्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू आहे. त्यासाठी ९९७०६३३००० किंवा ०२०-२४२०७१९४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.