सीतेचे व्यक्तिमत्त्व उलगडणारा ‘जानकीयान’ कार्यक्रम शनिवारी Print

प्रतिनिधी
गुरू गायत्री आंबेकर यांच्या शिष्या कोहिनूर दर्डा यांनी ‘जानकीयन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नृत्य व काव्यातून सीतेच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले जाणार आहे.
हा कार्यक्रम १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कोथरूड येथील कर्नाटक हायस्कूलमध्ये होणार आहे. राम व रावण यांच्याविषयी सीतेच्या मनात असलेल्या भावभावना, प्रेम, दया, भय, जय आदींचे प्रकटीकरण ‘कुचिपुडी’ या नृत्यप्रकारातून सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी ललिता बांठिया यांनी गीते लिहलेली असून तरुण संगीतकार गंधार संगोराम यांनी त्याला सुंदर चाली दिल्या आहेत, तर गायत्री आंबेकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.