चार ते पाच लाख पुणेकर मधुमेहाने ग्रस्त! Print

तरूण मधुमेहींची संख्याही वाढली
प्रतिनिधी
सुमारे चार ते पाच लाख पुणेकर मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्याहून गंभीर बाब म्हणजे ज्यांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहीत नाही अशा लोकांची संख्यासुद्धा तेवढीच आहे, अशी माहिती रूबी हॉल क्लिनिकमधील वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. अभय मुथा यांनी ही माहिती दिली.
‘मेडट्रॉनिक’ या कंपनीतर्फे मधुमेही व्यक्तींच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण वेळोवेळी तपासून शर्करा कमी झाल्यास उद्भवणारा ‘हायपोग्लायसेमिया’चा धोका टाळणारे एक आधुनिक उपकरण सादर करण्यात आले; या वेळी डॉ. मुथा बोलत होते.
डॉ. मुथा म्हणाले, ‘‘भारतात सहा कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०२५ सालापर्यंत ही संख्या ९ कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. यातही तरूणांना मधुमेह होण्याचे प्रमाण वाढते आहे. २० ते ३० वर्षे या वयोगटातील मधुमेहींमध्ये टाईप-३ मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतीयांमध्ये मधुमेह होण्याची अनुवांशिकता दिसून येते. तरूणांच्या झपाटय़ाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढतो आहे.’’

हायपोग्लायसेमियात रक्तातील शर्करेचे प्रमाण खूप कमी होते. शरीराला कंप सुटणे, घाम फुटणे, ओठ थरथरणे, चिडचिड होणे अशी याची लक्षणे असू शकतात. काही रूग्णांना ही परिस्थिती उद्भवण्यापूर्वी कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. या नवीन उपकरणाला इन्सुलिन पंप जोडलेला असतो. तसेच रक्तातील शर्करा मोजून तिच्या प्रमाणाची नोंद ठेवणाऱ्या ‘कन्टिन्युअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टिम’चाही या उपकरणात समावेश आहे. रूग्णाच्या रक्तातील शर्करा कमी झाली तर हे उपकरण एका अलार्मद्वारे रूग्णाला त्याची माहिती देते. इन्सुलिनचे खूप जास्त प्रमाण बाहेरून घ्यावे लागणाऱ्या रूग्णांना हे उपकरण उपयोगी पडेल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

सांगवीत सराफांना गंडा घालणाऱ्या भामटय़ांकडून साडेतीन कोटीचे सोने जप्त जयपूर व अहमदाबाद येथे फसवणुकीचे गुन्हे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सराफांना गंडा घालणाऱ्या भामटय़ांकडून गुन्हे शाखेने साडेतीन कोटीचे साडेदहा किलो सोने जप्त केले आहे. या भामटय़ांनी पुण्यातील सराफांबरोबरच जयपूर, गुजरात येथेही वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साहील मंगलभाई मोरझरीया (वय २७), किसन नागरदास गोकानी (वय ३७, दोघे रा. कांदिवली-पूर्व, मुंबई) व झरीन अहमद मेमन (वय २७, रा. बोरीवली-पूर्व, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोने खरेदी करणारा गुजरात येथील सराफ रितेश प्रेमचंद देसाई (वय ३९, अहमदाबाद) याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी नाव बदलून पिंपळे निलख येथे एक रो हाऊस भाडय़ाने घेऊन व्हीजन इन्व्हेस्टमेन्ट नावाची कंपनी सुरु केली. या ठिकाणी साहिल याने सोने-खरेदी विक्रीचा व्यवसाय करून सराफांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सहा ते सात किलो सोने खरेदी करायचे असल्याचे सांगून बोलावले आणि सोन्याची शुद्धता तपासायची असल्याचा बहाणा करून ते छोटय़ा पेटीत ठेवून लांबविले.
दरम्यानच्या काळात सप्टेंबर २०१२ मध्ये राजस्थान येथे जाऊन तिघांनी राकेश मेहता, जितेंद्र मेहता व मनिष मेहता अशी नावे धारण करुन मेहता इन्व्हेस्टमेन्ट नावाची कंपनी सुरु केली. या ठिकाणी सराफ दीपक मोसुन यांच्याकडील चार किलो शंभर ग्रॅम सोने विकत घेण्याचे सांगून हे सोने लंपास केले होते. त्यानंतर अहमदाबाद येथे श्रीराम असोसिएट नावाची कंपनी स्थापन करुन परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यासाठी पैसे घेऊन वीस लोकांना ४५ लाखांचा गंडा घातला होता. सांगवीच्या गुन्ह्य़ाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना हे आरोपी मुंबईमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी ९ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.