युनिकतर्फे दिवाळीनिमित्त वस्तूंचे प्रदर्शन Print

प्रतिनिधी
युनिक एज्युकेशन फाऊंडेशन व कॉसमॉस बँकेच्या संयुक्त विद्यमाने ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्य़ातील महिला बचत गटांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार पेठेतील रानडे बालक मंदिरात सकाळी १० ते रात्री ८ या वेळात भरणार आहे. या प्रदर्शनात पुणे जिल्ह्य़ातील सुमारे १०० महिला बचत गट सहभागी होणार आहेत. त्यात दिवाळीच्या विविध वस्तू, दागिने, आयुर्वेदिक उत्पादने व खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असतील, अशी माहिती युनिक एज्युकेशन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा माने व कॉसमॉस बँकेचे संचालक गोविंद क्षीरसागर यांनी दिली.