अनाथ मुलांसाठी दीपावली आनंद मेळाव्याचे आयोजन Print

प्रतिनिधी
लोकमान्य टिळक प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी (९ नोव्हेंबर) अनाथ व गरजू मुलांसाठी शनिवार वाडा पटांगणात ‘दीपावली आनंद मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्याच वेळी मंत्रालयाच्या आगीच्या वेळी जीव धोक्यात घालून भारतीय ध्वज काढणारे कर्मचारी आणि एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकांचाही या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.
हा आनंद मेळावा ५ ते ९.३० या वेळात होईल. त्यात विनामूल्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सिनेतारका महिमा चौधरी, नेहा पेंडसे, ‘फू बाई फू’ मधील विजय पटवर्धन, तृप्ती खामकर, सिद्धेश मालवणकर, ‘एकापेक्षा एक’ विजेती साक्षी तिसगावकर आदी कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच ‘संस्कृती महाराष्ट्राची’ तर्फे लाठी, काठी आणि मर्दानी खेळांचे कार्यक्रम सादर होणार आहेत.