ताराबाई किन्हीकर वक्तृत्व स्पर्धा Print

नागपूर / प्रतिनिधी
भारतीय स्त्रीशक्तीच्या नागपूर शाखेच्यावतीने खुल्या गटासाठी ताराबाई किन्हीकर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांसाठी खुली आहे. वक्तृत्व स्पर्धा हिंदी व मराठी भाषेत होईल. ‘अर्थार्जन न करणाऱ्या पत्नीला पतीच्या वेतनातून १० ते २० टक्के वेतन देण्यासंबंधी येणाऱ्या विधेयकाबद्दल माझा दृष्टिकोण’ असा स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धा शनिवारी ३ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सीताबर्डीच्या भिडे कन्या शाळेत होणार आहे. स्पर्धेचे शुल्क ५० रुपये राहील. स्पर्धकांनी ३० ऑक्टोबपर्यंत ८००७३९२२३ किंवा ९४२०४१०८९६ या क्रमांकावर स्पर्धेसाठी नोंदणी करावी.