स्टार बसवर दगडफेक Print

नागपूर / खास प्रतिनिधी
वेगात आलेल्या स्टार बसच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. त्यामुळे संतप्त जमावाने बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पंचशील चौकात हा अपघात घडला. जनता चौकाकडून झाशी राणी चौकाकडे एक पादचारी जात होता. त्याचवेळी धंतोलीकडून वेगात स्टार बस (एमएच/३१/सीए/६२४९) वेगात आली आणि झाशी राणी चौकाकडे वळली. वळताना बसने पादचाऱ्यास धडक दिली. अपघात झाल्याचे दिसताच बस चालक बस तेथेच सोडून पळून गेला. तेथून जाणारे लोक गोळा झाले. संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. अपघात झाल्याचे समजताच सीताबर्डी व धंतोली पोलीस तेथे पोहोचले. पोलीस आल्याचे दिसल्यानंतर लोक पळून गेले. गंभीर जखमीला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी बस चालकाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.