नक्षलवाद्यांच्या जीवनावरील ‘चक्रव्यूह’ आज प्रदर्शित Print

नागपूर / प्रतिनिधी
alt

गंगाजल, अपहरण, राजनीती, आरक्षण, असे उत्कृष्ठ चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक प्रकाश झा आता नवीन विषय घेऊन ‘चक्रव्यूह’ सादर करीत असून उद्या २४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नक्षलवाद्यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांची जीवनशैली आणि त्यांना पत्करावा  लागलेला मार्ग अशा विषयांचा यात समावेश आहे. या चित्रपटात अर्जून रामपाल, अभय देओल, ईशा गुप्ता, मनोज बाजपेयी, क बीर बेदी, ओम पुरी व मराठमोळी अंजली पाटील यांच्या भूमिको आहेत. राजनीतीमध्ये मनोज बाजपेयीची वीरेंन्द्र प्रताप सिंगची भूमिका लोकप्रिय ठरली. ‘आरक्षण’ या चित्रपटात झा यांनी मनोज बाजपेयीला दमदार भूमिके त सादर केले. आता पुन्हा एका दमदार भूमिकेत मनोज दिसणार आहे.
अभय देओलसुध्दा या चित्रपटात एका गंभीर भूमिकेत दिसेल. आतापर्यंत अभय देओलने रोमॅंटिक हीरो म्हणून भूमिका केली. ओय लक्की, लक्की ओय, देव डी, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शंघाई, आयशा असे हिट चित्रपट दिल्यावर अभय आता अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार आहे.
अर्जून रामपाल आणि अभय देओल यांची मैत्री, त्यांच्यात झालेला वाद व अभयची नक्षलवाद्यांशी असलेली जवळीक या चित्रपटात दिसणार आहे.
अर्जून रामपाल पोलीस अधीक्षक आदिल खानच्या भूमिकेत असून ईशा गुप्ता ही रिया मेनन या आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण पचमढी आणि भोपाळ येथे झाले. संगीत सलीम-सुलेमान यांनी दिले आहे.
या चित्रपटातील ‘बिरला हो या टाटा, अंबानी हो या बाटा, सबने अपने चक्कर मे देश को है बाटा हे गाण’ चर्चेचा विषय ठरले आहे.
नक्षलवाद्यांचा संघर्ष आणि पोलिसांचा लढा चांगल्या पध्दतीने सादर करण्याचा प्रयत्न झा यांनी केला आहे.