रावण दहन पाहण्यासाठी गर्दीचा महापूर Print

नागपूर / प्रतिनिधी
रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम.. रामायणातील विविध प्रसंगावर सादर केलेले नाटय़, फटाक्याची आतषबाजी, नयनरम्य लेझर शो आणि प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत शहरातील विविध भागात रावण दहनाचे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. सनातन धर्म सभेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कस्तुरचंद पार्क मैदानावर दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रावण दहन पाहण्यासाठी शहरातील विविध भागात नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. कस्तुचंद पार्क मैदानावर झालेल्या कार्यक्रमात खासदार अजय संचेती, शहर काँग्रेस अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, पोलीस आयुक्त अंकुश धनविजय, शहर भाजपचे अध्यक्ष कृष्णा खोपडे आणि दीपक कपूर यांच्या हस्ते रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय खेर, सुरेंद्रकुमार दुआ, संजीव कपूर, विनोद साहनी, किशोर राय, मुकेश गुप्ता, किशोर राय, समितीचे ज्येष्ठ सदस्य उमेश शर्मा, आमदार मितेश भांगडिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लंका दहन या लाईट अ‍ॅन्ड शोच्या माध्यामातून लंका दहनाचा प्रसंग सादर करताना ‘सियाबल रामचंद्र की जय’ चा जयघोष करीत लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला. यावेळी प्रभू श्रीराम चंद्र की जय चा जयजयकाराने परिसर दुमदुमुन गेला. संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात सनातर समाचार या मासिकाचे प्रकाशन यावेळी दीपक कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. दीनानाथ शर्मा, उमेश शर्मा व नरेंद्र सतिजा या अंकाचे संपादन केले आहे. यावेळी फटाका शो सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश शर्मा यांनी तर नरेंद्र सतीजा व ओमप्रकाश सोनी यांनी संचालन केले. विजय खेर यांनी आभार मानले. संस्थेचे मुख्य संरक्षक सतपाल खुल्लर, संरक्षक दीनानाश शर्मा, एस. के. दुआ, योगराज साहनी, सुरेंद्र संतराम, जे. के. थापर, विनोद साहनी आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.  भारतीय जनता युवा मोर्चा व मध्य नागपूर रावण दहन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिटणीस पार्कमध्येमध्ये रावण दहन कार्यक्रमासोबतच रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास, रवी भुसारी आणि मालू पेपर मिलचे कंपनीचे अध्यक्ष दामोधर मालू यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी आमदार विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, विलास त्रिवेदी, स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, राजेश कन्हेरे, माजी महापौर अर्चना डेहनकर, भाजयुमोचे अध्यक्ष बंटी कुकडे, बंडू राऊत, प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.   
रावण दहनाच्या पूर्वी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक बंडू राऊत, माजी महापौर देवराव उमरेडकर, राहुल खंगार, नवीन गायकवाड, हरीश महाजन यांनी  सहकार्य केले.  यशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग ५६ तर्फे समर्थ नगर परिसरात रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजीवनी चौधरी निर्मिती रामलिला कार्यक्रम सादर करण्यात आला. रेशिमबाग, नंदनवन, मेडिकल चौक, पाचपावली जयताळा या भागात रावण दहनाचे कार्यक्रम पार पडले.