संस्कृत विद्यापीठातर्फे सहा विद्वानांचा सत्कार Print

नागपूर / प्रतिनिधी
इंग्रजीशी वैर नाही. पण, इंग्रजीच्या कुबडय़ा घेऊन भावी पिढी कशी तयार होईल, असा सवाल उपस्थित करून असंस्कृतीचा अंध:कार हटवायचा असेल तर इंग्रजीच्या कुबडय़ा फेकून सु‘संस्कृत’ बनले पाहिजे, असे आवाहन निवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी केले.
रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने देशातील सहा संस्कृत विद्वानांचा सत्कार न्या. सिरपूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे तर सत्कारमूर्ती डॉ. सत्यव्रत शास्त्री, एन.पी. उन्नी, डॉ. गौतम पटेल, सरोजा भाटे, हरेकृष्णा शतापथी, डॉ. चांदकिरण सलोजा आणि संस्कृत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता नंदा पुरी आदी उपस्थित होत्या.
सिरपूरकरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन शास्त्री, उन्नी, पटेल, भाटे, शतापथी आणि सलोजा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नंदा पुरी यांनी केले. संचालन पराग जोशी यांनी केले तर विजयकुमार यांनी आभार मानले.