विलास मुत्तेमवारांचे ‘काऊंट डाऊन’ सुरू Print

नागपूर / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि  बदलाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी ‘फायनल काऊंट डाऊन’ सुरू  झाले आहे. येत्या रविवारी त्यांचा शपथविधी होणार असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले. मुत्तेमवारांना मंत्रिपद मिळाल्यास मुकुल वासनिक आणि विलास मुत्तेमवार असे दोन केंद्रीय मंत्री प्रतिनिधी विदर्भाचे प्रतिनिधीत्व करतील.
महागाई आणि  भ्रष्टाचार यासारख्या आव्हानांना तोंड देत असलेले डॉ. मनमोहन सिंग सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी अधिक सक्षम बनण्याच्या तयारीला लागले आहे. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची शक्यता संपल्यातच जमा असून त्यांना पक्षसंघटनेतच महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.  मनमोहन सिंग मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाणार असून काही वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू आणि राहुल ब्रिगेडमधील काहींनी संधी दिली जाणार आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि  बदलाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी ‘फायनल काऊंट डाऊन’ सुरू  झाले आहे. येत्या रविवारी त्यांचा शपथविधी होणार असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले. मुत्तेमवारांना मंत्रिपद मिळाल्यास मुकुल वासनिक आणि विलास मुत्तेमवार असे दोन केंद्रीय मंत्री प्रतिनिधी विदर्भाचे प्रतिनिधीत्व करतील.  महागाई आणि  भ्रष्टाचार यासारख्या आव्हानांना तोंड देत असलेले डॉ. मनमोहन सिंग सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी अधिक सक्षम बनण्याच्या तयारीला लागले आहे. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची शक्यता संपल्यातच जमा असून त्यांना पक्षसंघटनेतच महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.  खासदार विलास मुत्तेमवार पक्ष संघटनेत सक्रिय असून त्यांना त्यांच्या माध्यमातून विदर्भात काँग्रेसची स्थिती आणखी बळकट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. नवी दिल्लीत शपथविधी होईपर्यंत काहीच खरे नसते याची पुरेपूर जाणीव प्रचंड अनुभवी राजकारणी असलेल्या मुत्तेमवारांना असल्याने त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.