सोमानीतर्फे रविवापर्यंत सवलतीत बहिरेपणा तपासणी Print

नागपूर / प्रतिनिधी
बहिरेपणासाठी उपलब्ध आधुनिक उपचाराबद्दल जनसामान्यांत जागरूकतेसाठी ४ नोव्हेंबपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत वर्धा मार्गावरील श्रीवर्धन कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावरील सोमानी स्पीच अ‍ॅन्ड हियरिंग रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तज्ज्ञ श्रवणरोग विशेषक्षांकडून बहिरेपणा तपासणी व मार्गदर्शन सत्र सवलतीच्या शुल्कात आयोजित करण्यात आले आहे.
या सत्राअंतर्गत प्राथमिक तपासणीनंतर श्रवणशक्तीची तपासणी डिजीटल ऑडियोमीटरद्वारे तज्ज्ञ श्रवणरोग विशेषज्ञांकडून ध्वनिरक्षित वातावरणात केली जाईल. आढळून आलेल्या श्रवणदोषाच्या प्रकारास, व्यक्तीच्या वयास, कामाच्या स्वरूपास व पसंतीला अनुसरून कानाच्या मागचे किं वा कानाच्या आतले साध्या किंवा शंभर टक्के डिजीटल श्रवणयंत्राची चाचणी अनुभवी श्रवणरोग विशेषज्ञाद्वारे दिली जाईल, जेणेकरून आधीपेक्षा चांगले ऐकण्याचे अनुभव येतील. इच्छुक व्यक्तीचे कानाचे कच्चे माप घेतले जाईल, ज्यापासून त्यांच्याच कानाचे पक्के माप बनवून त्यांना दुसऱ्या फेरीत श्रवणयंत्रासोबत लावण्यात येईल. या सत्राअंतर्गत श्रवणयंत्रावर १० टक्के सूट दिली जाईल. श्रवणरोग विशेषज्ञांच्या मते जर लहान मूल जन्मापासून कर्णबधिर असले व बोलूही शकत नसले अशावेळी पालकांनी त्यांना श्रवणरोग विशेषज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य श्रवणयंत्र लावून स्पीच थेरेपी दिली तर ते मूल ऐकू व बोलू शकेल व पुढे सामान्य मुला-मुलींच्या शाळेत प्रशिक्षण घेऊ शकेल. या सत्राअंतर्गत तपासणी करून घेण्यास इच्छुक व्यक्तींनी सोमानी स्पीच अ‍ॅन्ड हियरिंग रिहॅबिलिटेशन सेंटर येथे भेटावे किंवा अधिक माहितीसाठी ९८२३१४६६६८ किंवा ९८२३०३६६६८ या भ्रमणध्वीवर संपर्क साधावा. येताना जुने तपासणीचे रिपोर्ट असल्यास सोबत आणावे व केसांना तेल लावून येऊ नये, असे आयोजकांनी कळवले आहे.