अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे शुक्रवारपासून द्वैवाषिक चर्चासत्र Print

गिरीश कुबेर प्रमुख पाहुणे
नागपूर / खास प्रतिनिधी
विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या वतीने येत्या शुक्रवारी, २ नोव्हेंबरला वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेत (पूर्वीचे मॉरिस कॉलेज) दोन दिवसांच्या द्वैवार्षिक आर्थिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या स्वातंत्र्य भवन सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादकगिरीश कुबेर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेटे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे भूषविणार असून शिक्षक आमदार कपिल पाटील आणि विभागीय शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर व्यासपीठावर उपस्थित राहतील. चर्चासत्रासाठी एकूण २५ शोधनिबंध प्राप्त झाले असून पहिल्या दिवशीच्या चर्चासत्राचा विषय ‘महाराष्ट्राची आर्थिक व सामाजिक स्थिती’ हा राहणार आहे. दुसऱ्या दिवशी, ३ नोव्हेंबरला ‘सहकार वृद्धी व ऱ्हास’ या विषयावरील शोधनिबंधांचे वाचन होईल. ज्येष्ठ सहकार अभ्यासक व विदर्भ प्रीमियर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र दुरुगकर तसेच अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष बि.बि. इंदौरे यांचे यावेळी व्याख्यान होणार आहे. यानंतर ‘सध्या जगात सुरू असलेल्या मंदीचे कारण, स्थिती आणि ‘युरोप खंडातील मंदी व भारत’ या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांचेही भाषण आयोजित करण्यात आले आहे. समारोप सोहळ्यात महापौर अनिल सोले, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांची प्रमुख उपस्थिती राहील. चर्चासत्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वाणिज्य शिक्षकांना अधिक माहितीसाठी ९८५२९३६४२, ९४२२८३८१४ आणि ९३६०५२२८२ या मोबाईलवर संपर्क साधता येईल, असे मंडळाचे अध्यक्ष डॉ. हसनअली हुद्दा यांनी एका पत्रकातून कळविले आहे.