अचानक ठरला शक्तिप्रदर्शनाचा घाट Print

गडकरींचे नागपुरात जंगी स्वागत
नागपूर / प्रतिनिधी
alt

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज नितीन गडकरी यांचे विमानतळावर आणि महालमधील निवासस्थानी ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, हे दाखवून देण्यासाठी आज अचानक शक्तिप्रदर्शनाचा घाट घालण्यात आला.
हिमाचल प्रदेशमधील निवडणूक प्रचारदौरा आटोपून नितीन गडकरी आज सकाळी नागपुरात परत आल्यावर त्यांचे नागपूर विमानतळावर भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे आणि महापौर अनिल सोले यांनी गडकरी यांचे स्वागत केल्यानंतर विमानतळावरून निवासस्थानी आल्यावर ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्याची आतषबाजी करीत गडकरी यांचे कार्यकर्त्यांतर्फे स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन गडकरी यांच स्वागतासारखाच माहोल आज निवासस्थानी होता. गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाला गेल्या काही दिवसात लक्ष्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पूर्ती उद्योग समूहातील अनेक कर्मचारी आणि पदाधिकारी हातात फलक घेत ‘गडकरी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत सहभागी झाले होते. निवासस्थानी परिसरात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम नियोजित नसला तरी नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांसमोर आपले मन मोकळे करण्याची विनंती कृष्णा खोपडे यांनी केल्यावर गडकरी यांनी जवळपास अध्र्या तास भाषण केले. भंडारा, गोंदिया जिल्ह्य़ासह बेला आणि परिसरातील शेतकरी तसेच आमदार सुधाकरराव देशमुख, विकास कुंभारे, सुधीर पारवे, स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके, प्रमोद पेंडके, बंडू राऊत, संदीप जोशी, अविनाश ठाकरे यांच्यासह शहरातील विविध पदधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.