सेवादल महाविद्यालयातर्फे जैववैविध्यावर आंतरराष्ट्रीय परिषद Print

नागपूर /प्रतिनिधी
सेवादल महिला महाविद्यालयातर्फे ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘ग्लोबल चेंज- इम्पॅक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी , कल्चर अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून परिषदेला विविध देशांमधील पर्यावरण तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे यांनी दिली. परिषदेचे उद्घाटन सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये सकाळी १० वाजता जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. इ.के. भरुचा यांच्या हस्ते होणार आहे.