मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी Print

नागपूर / प्रतिनिधी
चिपळूणमध्ये ११ ते १३ जानेवारी २०१३ ला होऊ घातलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्या प्रतिनिधींना जायचे आहे त्यांच्यासाठी गुरुवारपासून प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. तीन दिवसाचे निवास-भोजन व उपस्थितीसह २ हजार ५०० रुपये शुल्क भरून संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होता येईल. वातानुकूलित निवास व्यवस्थेसाठी एक हजार रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
प्रतिनिधींची निवास व्यवस्था लॉज किंवा सभागृहात करण्यात येण्यात येणार आहे. १० डिसेंबरपूर्वी ज्या सभासदांची नोंदणी होईल त्यांनाच निवास व्यवस्था देण्यात येईल. नोंदणी करणाऱ्या सभासदांची उपलब्धतेनुसार निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींना १० डिसेंबपर्यंत विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल, चौथा माळा, झाशी राणी चौक या ठिकाणी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत नोंदणी करता येईल.
अधिक माहितीसाठी विदर्भ साहित्य संघ ०७१२-२५५३७६७, प्रकाश घायाळकर ०९०४९०५४१४३ (चिपळूण) आणि कल्याण वाणी ९४२११३४४९४ या यांच्याशी संपर्क साधावा, असे विदर्भ साहित्य संघाने कळविले आहे.