नवोदितांना घडविणारी कार्यशाळा Print

नागपूर/प्रतिनिधी

धनवटे नॅशनल महाविद्यालयात मराठी विभागातर्फे विद्यापीठस्तरीय द्विदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन समीक्षक डॉ. आशा सावदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते. निवेदन- कला, मराठी भाषा-व्याकरण मुलाखत कौशल्य, तसेच वृत्तपत्रीय बातमी व साहित्य-लेखन या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या माध्यमातून नवोदितांना प्रशिक्षित करण्याची संधी उपलब्ध होते. तसेच नवे आयाम आणि दिशा निश्चित करण्याची जाणीव करून देता येते, असे डॉ. आशा सावदेकर यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. कार्यशाळेमागील भूमिका डॉ. रत्नाकर भेलकर यांनी सांगितली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना देशमुख यांनी केले. प्रास्ताविक संयोजक डॉ. भारती खापेकर यांनी तर आभार डॉ. शोभा जांभुळकर यांनी मानले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. कोमल ठाकरे यांनी निवेदन एक प्रभावीशैली या विषयावर पुष्प गुंफले. या सत्राचे सूत्रसंचालन बादल श्रीरामे यांनी तर सौरभ राणे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मनोहर रोकडे यांनी मराठी भाषा व व्याकरण या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. भारती खापेकर यांनी तर रवींद्र गुंडे यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी उपस्थित होते. वक्ते म्हणून समीक्षक डॉ. प्रदीप विटाळकर उपस्थित होते. या सत्राचे संचालन डॉ. साधना ठाकरे यांनी केले. डॉ. भारती खापेकर यांनी आभार मानले. कार्यशाळेत अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.