समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा शपथविधी Print

नागपूर / प्रतिनिधी
समता सैनिक दलाच्या एकीकृत विविध गटातील समता सैनिकांनी ५६व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित       केले.
शिबिरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई येथून आलेल्या ६५८ समता सैनिकांनी भाग घेतला. दलाचे चीफ कमांडर अनिल इंगळे यांनी विवेकानंद हिंदी प्राथमिक शाळेच्या पटांगणावर कवायती व इतर प्रशिक्षण दिले.
समता सैनिकांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी निलेश मेश्राम होते.