लोकसेवकांच्या गैरप्रकारांची तक्रार करणाऱ्यांचा सत्कार Print

नागपूर / खास प्रतिनिधी
लोकसेवकांच्या गैरप्रकारांची तक्रार करणाऱ्या चाळीसजणांचा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागातर्फे शनिवारी सत्कार करण्यात   आला. नवीन सुभेदार लेआऊटमधील शिवाजी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय कामगार एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक निशिथ मिश्र यांनी द्वीप प्रज्वलन केले.
 गेल्या वर्षांत लोकसेवकांच्या गैरप्रकाराची तक्रार करणाऱ्या चाळीसजणांचा त्यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. उपअधीक्षक सुरेश लांबट यांनी प्रास्ताविक केले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, हरिश्चंद्र रेड्डीवार, सुधीर नंदनवार, अनिल लोखंडे, देवीदास ईलमकर, शेख शब्बीर, आर. एस. शिरसाट, देवकी उइके, पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, प्रताप इंगळे, प्रदीप चौगावकर, नरेंद्र वानखेडे, डी. मंडलवार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित       होते.  कार्यक्रमाचे संचालन उपअधीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केले. उपअधीक्षक  चंद्रशेखर बहादुरे यांनी आभार     मानले.