मराठी रंगभूमी दिनानिमित्त चर्चा Print

नागपूर / प्रतिनिधी
मराठी रंगभूमी दिनानिमित्त विदर्भ सांस्कृतिक आघाडी, प्रगतिशील लेखक मंच आणि धरमपेठचे राजाराम वाचनालय यांच्यावतीने एका चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन ११ नोव्हेंबरला करण्यात आले आहे.
‘रंगभूमीच्या वेगळ्या, समांतर आणि वैचारिक प्रवाहांचे काय?’ या विषयावरील हा कार्यक्रम येत्या रविवारी दुपारी ४ वाजता राजाराम वाचनालय, धरमपेठ येथे होईल. रंगभूमीच्या विविध प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारे रंगकर्मी यात सहभागी होतील.
किलबिल थिएटरचे जॉनी मेश्राम, प्रोग्रेसिव्ह थिएटरचे प्रभाकर दुपारे, अभिनव कलानिकेतनचे दादाकांत धनविजय, दलित रंगभूमीचे संजय जीवने, बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणवीर, सम्यक थिएटरचे सुनील रामटेके, सूर्यकुल नाटय़निकेतनचे अशोक जांभुळकर, बोधी फाऊंडेशनचे सलीम शेख, न्यू टॅलेंटचे सारनाथ रामटेके, ‘कलातरंग’चे लक्ष्मीकांत देशपांडे, मराठी नाटय़परिषदेच्या नागपूर शाखेचे संजय भाकरे, नवप्रतिभा कला मंदिराचे अनिल चनाखेकर, हौशी रंगमंच संघटनेचे दिलीप ठाणेकर यांच्यासह दिग्दर्शक- कलावंत पराग घोंगे, दिनकर बेडेकर, झाडीपट्टी रंगभूमीचे प्रभाकर आंबोणे, वत्सला पोलकमवार व इतरांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यावेळी अध्यक्षस्थानी राहतील.
रंगभूमीच्या विविध प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नव्या-जुन्या नाटय़संस्था, दिग्दर्शक व कलावंत या निमित्ताने एकत्र येत आहेत. रंगप्रेमी व नाटय़कर्मी यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.