गुरुमंदिरात रविवारी प्रदक्षिणा सोहळा Print

नागपूर / प्रतिनिधी
जयप्रकाश नगरातील श्रीगुरुमंदिरात गुरुद्वादशीच्या पर्वावर येत्या ११ नोव्हेंबरला अखंड औदुंबर प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.येत्या रविवारी सकाळी साडेसहा वाजता सामूहिक संकल्पाचा उच्चार होऊन प्रदक्षिणा सोहळ्याला प्रारंभ होईल.
सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत भक्तांना यात सहभागी होता येईल. यानंतर पालखी प्रदक्षिणा होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांना केंद्र प्रमुख कल्याण पुराणिक (९८८१६१३९०५) यांच्याशी संपर्क साधता येईल.