‘रेशीम बंध’तर्फे दिवाळीनिमित्त नोंदणीवर सूट Print

नागपूर / प्रतिनिधी
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर १० व ११ नोव्हेंबरला नोंदणी करणाऱ्यांना ‘रेशीम बंध’ विवाह संस्थेतर्फे नोंदणीवर विशेष सूट देण्यात येणार आहे. ‘रेशीम बंध’ मॅरेज इन्फरर्मेशन सिस्टिम प्रा. लि. ने www.reshimbandh.com  ही अद्ययावत वेबसाईट सर्व समाजांसाठी बनवलेली असून जगभरातील विवाहेच्छुक वधू-वरांच्या पालकांना जलद सेवा मिळण्यासाठी असलेल्या ऑनलाईन नोंदणी सुविधेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, असे कंपनीच्या संचालिका कविता देशपांडे यांनी सांगितले.
 या अंतर्गत वेबसाईटवर नोंदणी केल्यावर काही क्षणातच स्थळांची यादी फोटोसह दिसत असून जलदगतीने मनपसंत जोडीदार निवडण्यास वाव मिळतो. नागपूरच्या मुख्य कार्यालयासह महाराष्ट्रात तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील बहुतेक ठिकाणी ‘रेशीम बंध’ चे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. वेबसाईटवर ऑनलाईन किंवा कार्यालयात नोंदणी केल्यावर वधू-वरांना युझर नंबर व पासवर्ड मिळतो. त्यामुळे ते जगभरात कोठेही वेबसाईट उघडून स्थळांची यादी पाहू शकतात व पत्ते मिळवू शकतात. ऑनलाईन नोंदणी न करू शकणाऱ्या उमेदवारांची नोंदणी कार्यालयात करता येते. तेथेच त्यांना स्थळांची यादी देण्यात येते. ‘रेशीम बंध’ च्या वेबसाईटवर विवाहेच्छुकांची सर्वोच्च संख्या असून गेल्या १० वर्षांत लोकांना उत्तम सेवा देण्याच्या कंपनीच्या प्रयत्नाला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. इंटरनेटवर वेबसाईट ही अत्यंत खर्चिक, महागडी बाब असूनही कंपनीने कमी नोंदणी मूल्यात सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कंपनीचे मुख्य कार्यालय  ‘रेशीम बंध’ विवाह संस्था. १०१, सरस्वती सदन, दुसरा माळा, विदर्भ स्टेशनर्सच्या समोर, लक्ष्मीभवन चौक, धरमपेठ (दूरध्वनी क्र. ०७१२- २५३०४५०/ २५६१९६९ भ्रमणध्वनी क्र. ९७६६९६०८५१) येथे दररोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत संपर्क साधता येईल.