काश्मीरच्या विद्यार्थ्यांची प्रहार मिलिटरी स्कूलला भेट Print

नागपूर / प्रतिनिधी
सद्भावना मिशन अंतर्गत काश्मिरातील २३ विद्यार्थी व चार शिक्षकांनी मेजर वीरेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रहार मिलिटरी स्कूलला भेट दिली. यावेळी प्रहार मिलिटरी स्कूलच्या बॅण्ड पथक, अश्वपथक व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. काश्मीरमधील खंडवाराच्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेचे १५, युथ क्लब स्कूलमधून तीन तर बळकूट येथील आर्मी गुडवील पब्लिक स्कूलमधून ५ विद्यार्थी भेटीस आले आहेत.
काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रहार’च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. देशभक्तीपर गीत, सामूहिक गीत, नृत्य व देवीचा गोंधळ सादर केला. काश्मीरच्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांनी गार्डस् रेजिमेंटल सेंटर, प्रहारगड, जकाते प्रहार प्रकल्पाला भेट देऊन साहसी उपक्रमाचा आनंद घेतला. त्यांना वाचनालय, शूटिंगरेंज, कलादालन दाखविण्यात आले. कार्यक्रमाला सी.पी. अॅण्ड बेरार संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महाजन व संस्थेचे सभासद प्रामुख्याने उपस्थित
होते.  कार्यक्रमाचे संचालन असिधरा लांजेवार यांनी केले. प्रहार वासुदेवलीला विद्याकुंजच्या बालगोपालांनी देशभक्तीपर गीत सादर करून वेगळा ठसा उमटविला. काश्मीरचे विद्यार्थी गुरुवारी सायंकाळी पुण्याला रवाना झाले.