निफाडमध्ये उद्या काँग्रेस मेळावा Print

विधानसभानिहाय चर्चा होणार
नाशिक / प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी निफाड बाजार समितीत शुक्रवारी शेतकरी व युवक मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व गृह तथा ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, प्रभारी अ‍ॅड. गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
जिल्हा काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी ही माहिती दिली. आ. ठाकरे हे दिंडोरी व धुळे लोकसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी विधानसभानिहाय चर्चा करणार आहेत. त्यानुसार सकाळी ११ वाजता युवक काँग्रेस, सकाळी ११.२० वाजता महिला काँग्रेस, सकाळी ११.४० वाजता निफाड, दुपारी १२ येवला, १२.३० दिंडोरी-पेठ, १२.४० चांदवड व देवळा, दुपारी एक वाजता कळवण व सुरगाणा, १.४० नांदगाव व मनमाड, १.४० बागलाण तसेच दोन वाजता मालेगाव, याप्रमाणे विधानसभा मतदारसंघनिहाय शिष्टमंडळाशी चर्चा करणार असून त्यानंतर दुपारी तीन वाजता शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करणार असल्याचे पानगव्हाणे यांनी सांगितले.