‘निमा’च्या अध्यक्षपदी डॉ. अनिल निकम Print

नाशिक / प्रतिनिधी
नॅशनल इन्टिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) नाशिक जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येथील रावसाहेब थोरात सभागृहात झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. सुधीर तांबे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुहास चौधरी, नगरसेवक डॉ. विशाल घोलप उपस्थित होते. प्रास्ताविक मावळते अध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार डॉ. अनिल निकम यांच्याकडे सोपविला. सुहास चौधरी यांनी आयुर्वेद पदवीधारकांना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी डॉ. निकम यांना समाजाभिमुख कार्य करण्याचा सल्ला दिला. डॉ. निकम यांनी निमाचे भव्य रुग्णालय व निमा भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला. निमाचे संघटक व प्रवक्ते डॉ. राहुल पगार यांनी कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी संगीत रजनीही झाली. यात डॉ. दीपक क्षत्रिय यांना गायनात प्रथम पारितोषिक मिळाले. परीक्षक म्हणून डॉ. बी. आर. दायमा व डॉ. निलांबरी शुक्ल हे होते.