सिंचन समस्येवर रविवारी प्रदीप पुरंदरे यांचे व्याख्यान Print

उस्मानाबाद
पाणीटंचाई व दुष्काळ या समस्या दरवर्षी उग्र रूप धारण करीत आहेत. त्यांचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय त्यावर उपाय शोधता येणार नाही. या अनुषंगाने संडे कल्चर कार्यक्रमांतर्गत औरंगाबादचे अभ्यासक डॉ. प्रदीप पुरंदरे यांचे ‘सिंचन समस्या व पाणी प्रश्न’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विवेकानंद सभागृहात रविवारी (दि. ७) दुपारी ३ वाजता हे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसूळ राहतील.
जिल्हय़ातील अभ्यासक, विद्यार्थी, पाणी विषयाशी संबंधित कार्यकर्ते, नागरिकोंनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संडे कल्चरच्या वतीने सुनील बडूरकर यांनी केले आहे.