मराठवाडय़ाची संरचना; परभणीत आज चर्चासत्र Print

परभणी/वार्ताहर
बी. रघुनाथ महाविद्यालयात परभणी व मराठवाडा अर्थशास्त्र परिषद यांच्या वतीने उद्या (गुरुवारी) मराठवाडय़ातील आधारभूत संरचना व विकास या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. झुंबरलाल मुथा, तर उद्घाटक अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. के. के. पाटील आहेत. मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. बी. के. शिंदे, सचिव व कोषाध्यक्ष डॉ. तुकाराम मुंडे, तिसाव्या मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बालाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
समारोपास प्राचार्य डॉ. जी. व्ही. शिंदे, तसेच अध्यक्षस्थानी गोदावरी शिक्षण मंडळाचे सचिव ओमप्रकाश डागा आहेत. वाणिज्य, अर्थशास्त्र विषयांतील तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास सोनवणे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश मेहत्रे यांनी केले आहे.