महिला टेबल टेनिस स्पर्धेत संत तुकाराम संघ अजिंक्य Print

लातूर/वार्ताहर
जिल्हास्तरीय महिला टेबल टेनिस स्पर्धेत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या संघाने खेळाचे सातत्य राखत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात जिल्हास्तरीय महिला टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलची सई आयाचित, श्रेया काळगे, सायली डोंगरे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघाची विभागीय स्तरासाठी निवड करण्यात आली. विजेत्या संघाचे प्राचार्य सुरेश कुमार, अनिरुद्ध बिराजदार, रवींद्र जगताप आदींनी अभिनंदन केले.