हिंगोलीत जोरदार पाऊस Print

हिंगोली/वार्ताहर
जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी हस्ताचा चांगला पाऊस पडला. गेल्या २४ तासांत १४९.४८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाची सरासरी २९.९२ मिमी असून चालू वर्षी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ७६.४२ मिमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत ती कमी आहे. दरम्यान, परतीच्या जोरदार पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्य़ात मंगळवारी दुपारी हस्ताचा पाऊस सुरू झाला. बुधवारी दुपारी दोनपर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. संध्याकाळीही जोरदार पाऊस कोसळला. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची नोंद मिमीमध्ये, कंसात चालू वर्षी एकूण झालेला पाऊस - हिंगोली ३१(७४१), वसमत २६.२८ (७४९.८४), कळमनुरी २४.३० (६५६.१७), औंढा नागनाथ ३७ (६५५), सेनगाव ३१ (६००). जिल्ह्य़ात चालू वर्षी सरासरी ७६.४२ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच तारखेला जिल्ह्य़ात सरासरी ८९.४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. हस्ताच्या पावसाने शेतक ऱ्यांच्या काढणीला आलेल्या व शेतात काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले असले, तरी हा पाऊस रब्बी पिकांसाठी उपयोगी ठरणार आहे.