दंगलीतील मुख्य आरोपीनेच जाळले दैनिकाचे कार्यालय! Print

नांदेड/वार्ताहर
देगलूर दंगलीतील मुख्य आरोपी मीरा मोईयोद्दीन यानेच दैनिक गावकरीचे कार्यालय जाळल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपी अटक टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याची माहिती हाती आली.
देगलूरमध्ये १५ दिवसांपूर्वी दंगल झाली. यात हे कार्यालय पेटवून दिले होते. या कृत्याचा पत्रकारांनी निषेध केला. दंगलीचा मुख्य ज. जाकेर म. गौस व शे. मिरा मोईयोद्दीन शे. सालार यांनीच माध्यमाचे कार्यालय पेटवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचे दोन साक्षीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. दंगलखोरांना अटक होऊ नये, यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य आरोपीला अद्याप अटक झाल नाही. दरम्यान, पत्रकार संघटनेच्या आग्रहानंतर विवेक केरूरकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले.