बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू Print

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एका एस.टी. बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. हिंगोली-पुणे या बसमध्ये हा प्रकार घडला. हिंगोलीहून  निघालेल्या या बसमध्ये (एमएच २० बीएल १७४६) जिंतूर येथून अकराच्या दरम्यान हा प्रवासी बसला होता. दुपारी साडेचारच्या आसपास येथील मध्यवर्ती स्थानकात ही बस आली.  त्याला उठवण्यास गेलेल्या वाहकाला संशय आला. त्याचे बसमध्येच निधन झाले होते. पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.