वाहतूक पोलिसाला कर्मचाऱ्यांची मारहाण Print

औरंगाबाद/प्रतिनिधी
गॅसची नोंदणी बदलण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान शिवीगाळ व वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात झाले. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जुनाबाजार येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. अनिल खरात असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरात यांची बहीण तिची गॅसची नोंदणी इतरत्र बदलून मिळण्याबाबत अंबर गॅस एजन्सीमध्ये गेली होती. परंतु तेथे कर्मचाऱ्यांनी अनुचित भाषा वापरली. त्याची विचारणा करण्यास खरात या एजन्सीत गेले होते. या वेळी संबंधित कर्मचाऱ्यांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. हे प्रकरण शिवीगाळ व नंतर खरात यांना मारहाण करण्यापर्यंत गेले.