अखेर ‘ते’ मंडप हटविले! Print

लातूर/वार्ताहर
शहरातील औसा रस्त्यावर मंडप टाकून चारचाकी वाहनांचे मार्केटिंग केले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’मध्ये बुधवारी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी मंडप काढून टाकले.
‘दिवाळीची खरेदी अन् नियमांची पायमल्ली’ या मथळ्याखाली हे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली व त्यांनी चारचाकी वाहनंचे विनापरवाना मंडप टाकून सुरू असलेले मार्केटिंग बंद केले. त्याचबरोबर छोटय़ा विक्रेत्यांना मात्र या मंडळींनी त्रास दिला नाही, हे विशेष.
बांधकाम खाते त्यांच्या विरोधात बातमी छापून आल्यानंतर का होईना जागे झाले, हेही नसे थोडके!