सव्वातीन लाखांचा गुटखा जप्त Print

बीड/वार्ताहर
शहरातील जालना रस्त्यावरील गणेश ट्रान्सपोर्टजवळ तीन लाख ३० हजार रुपयांचा गुटखा मंगळवारी पकडण्यात आला.हैदराबाद येथून शहरातील गणेश ट्रान्सपोर्ट येथे मालमोटारीतून आलेला गुटखा उतरविला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना मिळाली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक एस. डी. शेवगण यांच्या आदेशानुसार पोलिसांनी छापा टाकून ३ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी मोहमद शफीक गयासोद्दीनला अटक करण्यात आली.