कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री Print

औरंगाबाद/प्रतिनिधी
येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून त्यांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याचा उपयोग कैदी कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या पुनर्वसनासाठी होतो. या कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री गेल्या दि. २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. फ्लॉवर पॉट स्टँड, शोभेची ट्री प्लान्ट, मेणबत्ती स्टँड, सागाचे छोटे स्टूल, पाट, हातरुमाल, टॉवेल, चादर, बेबी फ्रॉक, पंजाबी सूट आदी वस्तू कैद्यांनी तयार केल्या आहेत. या वस्तूंची खरेदी येत्या जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे, असे कारागृह अधीक्षकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.