मुलींच्या मृत्यूचे कारण अद्यापि कळू शकले नाही. Print

हिंगोली/वार्ताहर
जिल्ह्य़ातील वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या गिरगाव येथील बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात राहटी शिवारात सापडल्याने या भागात एकच खळबळ उडाली.
मुक्ता प्रकाश नांदरे (वय १८) व अनसूया चांदू वाघमारे अशी मृत मुलींची नावे आहेत.
बारावीची सराव परीक्षा देण्यासाठी मुक्ता व अनसूया या दोघी वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयात गेल्या होत्या. परंतु त्या रात्री परत न आल्याने अनसूयाच्या वडिलांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोखर्णी येथील नृसिंह मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोन मुली एका मुलासमवेत आल्याचे चित्रण पोलिसांना मिळाले आहे. अधिक तपास करतानाच या दोन्ही मुलींचे मृतदेह पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात सापडले.