गुरू रविदास साहित्य संमेलनास आज प्रारंभ Print

परभणी/वार्ताहर
तिसऱ्या अखिल भारतीय दोन दिवसीय गुरू रविदास साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) होणार आहे. या निमित्त सकाळी ग्रंथ परिवर्तन फेरी काढण्यात येणार आहे.
जायकवाडी वसाहतीतील कल्याण मंडपम येथे होणाऱ्या या संमेलनाचे सकाळी १० वाजता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री सी. दामोधर राज नरसिम्हा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
संमेलनात नृत्याविष्कार, कथाकथन, परिसंवाद, शाहिरी जलसा, कविसंमेलन, चर्चासत्र, महिला परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
समारोप संमेलनाध्यक्ष प्रा. जगदीशचंद्र सितारा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी ३ वाजता होणार आहे.
संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष महापौर प्रताप देशमुख, अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रदेशाध्यक्ष बालाजी जमदाडे आदींनी केले आहे.