राजुरा तालुक्यात वीज पडून १ ठार Print

जिल्ह्य़ात आज सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असतांना राजुरा तालुक्यातील डोंगरगांव येथे वीज पडून विजय गव्हारे या ३६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. शहर तसेच ग्रामीण भागात काल सायंकाळी तसेच आज पहाटे मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्य़ात हा पाऊस सर्वत्र होता. राजुरा येथून जवळच डोंगरगांव येथे विजय गव्हारे हा शेतात काम करत होता. नेमकी त्याच वेळी आकाशात वीज कडाडली आणि विजयच्या अंगावर पडली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.