दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
वरोरा येथील लोकमान्य टिळक विद्यालयातील दहाव्या वर्गातील विद्यार्थी योगेश फुलझेले व ऋषीकेश लिहीतकर या दोघांचा वर्धा नदीवरील तुलना घाट येथे बुडून मृत्यू झाला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त काल सुटी असल्याने योगेश व ऋषीकेश हे दोघे मित्र वरोरा येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तुलना घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहत असतांना दोघेही खोल पाण्यात गेले आणि तेथून किनाऱ्यापर्यंत पोहोचता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. या दोघांना पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली. रात्री उशिरा या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.