राज्यात कुष्ठरोग शोधमोहीम सुरू Print

वर्धा / प्रतिनिधी    
राज्यातील २२ जिल्ह्य़ांमध्ये चालणाऱ्या कुष्ठरोग शोधमोहिमेस गांधीजयंतीचे औचित्य साधून प्रारंभ करण्यात आला. मोहिमेचा एक भाग म्हणून शाळकरी मुलांची आज प्रभातफे री काढण्यात आली. सर्वसामान्यांना मोहिमेची माहिती व्हावी म्हणून काढण्यात आलेल्या या प्रभातफे रीत हजारो मुलांचा सहभाग होता. तुकडोजी विद्यालयाच्या नेतृत्वातील या फेरीने शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण केले.