लालबहादूर शास्त्री व गांधीजींना अभिवादन Print

गोंदिया/ वार्ताहर
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान दिवं. लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान दिवं. लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील नाझर मेनन व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.