संक्षिप्त Print

डॉ. आईंचवारांची सदिच्छा भेट
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी जनता महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष उपस्थित होते. वाणिज्य शाखेतर्फे उपप्राचार्य जे. एम. सोमानी यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. विजय आईंचवार याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या वेळी वाणिज्य शाखेचे माजी प्राचार्य वर्मा व प्राध्यापक ठाकरे, टक्कामोरे, नाकतोडे, बिसन, मिश्रा व उमाटे यांची आस्थेने विचारपूस केली. डॉ. आईंचवार यांनी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासक्रमांची सखोल माहिती घेतली व नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्राध्यापकांशी संवाद करताना त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाबाबत त्यांच्या काय कल्पना आहेत व त्या कशा प्रकारे साकार करता येतील, यावर सविस्तर चर्चा केली. यात डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य प्रा. जे.एम. सोमानी, प्रा. निरंजने, प्रा. बोढाले, प्रा. डॉ. नरांजे, प्रा. हरणे, प्रा. गवई, प्रा. चेटपल्लीवार, प्रा. सुरेश सोमानी यांनी सहभाग दर्शविला. त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेचे माजी प्राचार्य वर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निर्माण केलेल्या वाणिज्य उद्यानाला भेट दिली.
देवानंद साखरकर यांना पुरस्कार
येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांना वन्यजीव छायाचित्राचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. वन्यजीव सप्ताह समारोपीय कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळा नागपूर येथील अमृतभवनात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. जोशी, अप्पर प्रधान ए. के. सक्सेना, ए.के. मिश्रा, एस.डब्ल्यू. एच. नकवी, मारुती चितमपल्ली व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के. जोशी यांच्या हस्ते देवानंद साखरकर यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. साखरकर यांना यापूर्वी अण्णाभाऊ साठे समाजसेवा पुरस्कार, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, मुंबई व चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराबद्दल अ‍ॅड. रवींद्र भागवत, अशोकसिंग ठाकूर, आनंद आंबेकर, श्रीराम पान्हेरकर, अ‍ॅड. अंजली हस्तक यांनी अभिनंदन केले आहे.
कोमल खोब्रागडे यांची निवड
प्रजासत्ताक शिक्षक संसद जिल्हाध्यक्षपदी कोमल खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पी.डब्ल्यू. मेश्राम, तर प्रजासत्ताक शिक्षक संसदेचे संस्थापक अध्यक्ष डोंगरे, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी अनिल पेटकर, एस.जी. शेंडे, सहसचिव अमर वाळके, एन.यू. माहोरकर, कोषाध्यक्ष एस.बी. खोब्रागडे, सदस्य दिवाकर शेंडे, मनोज भसारे, प्रा. आर.एन. शेंडे, वैशाली चिमुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला रामदास ताकसांडे, नवनाथ तेलंग, दखने, प्रवीण पाटील, प्रा. प्रकाश गोडघाटे, रमेश निमसटकर, पी.एस. मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. व्ही.के. बांबोळे, संचालन प्रा. अंबादास रायपुरे यांनी, तर आभार बी.जी. वनकर यांनी केले.
निमा शाखेची आमसभा
निमा शाखेची आमसभा नुकतीच पार पडली. या वेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. प्रदीप मोहुर्ले यांची निवड करण्यात आली. सचिवपदी लक्ष्मीनारायण, संघटकपदी डॉ. दीपक भट्टाचार्य, कोषाध्यक्ष डॉ. नितीन गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. राजीव धानोरकर, डॉ. गजेंद्र गणीगर, सहसचिव डॉ. संदेश गोजे, डॉ. पंकज येरणे, उपसचिव डॉ. मिलिंद जीवने, डॉ. पवन मरकडेवार यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. विजय धनकर व डॉ. बाबा दानव यांनी काम बघितले. सभाध्यक्षपद डॉ. गो.वा. अंदनकर, डॉ. मनोहर लेनगुरे यांनी भूषविले. सभेचे संचालन डॉ. दीपक भट्टाचार्य यांनी, तर अहवाल वाचन डॉ. सुधीर मत्ते यांनी केले. या निवडीबद्दल डॉ. गो.वा. अंदनकर, डॉ. विजय धनकर, डॉ. बाबा दानव, डॉ. राजू ताटेवार, डॉ. सतीश बंडावार, डॉ. मनोहर लेनगुरे, डॉ. भूपेंद्र लोढिया, डॉ. यशवंत सहारे, डॉ. सुधीर मत्ते, डॉ. डी.जी. उपलेंचीवार, डॉ. नितीन बिश्वास यांनी अभिनंदन केले.
ऑटोमोबाइल असो.च्या अध्यक्षपदी रेगुंडवार
चंद्रपूर ऑटोमोबाइल असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीकांत रेगुंडवार यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत सचिव म्हणून विवेक चकनलवार, उपाध्यक्षपदी जितीन हलवादिया, कोषाध्यक्ष वासुदेव जाधवानी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे मावळते अध्यक्ष प्रकाश ताटपल्लीवार, हरीश काच्छेला, देवेन शाह उपस्थित होते. या वेळी दिनेश जोशी, दिलीप रायकुडलीया, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, रामकिशोर सारडा, विनोद बजाज, चंद्रकांत अंजीकर, विवेक पत्तीवार व संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते. या सर्वानी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.